मुक्तसर : पंजाबमधल्या मुक्तसरमध्ये घडलेली एका धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.
एक पुरुष एका महिलेला जबरदस्तीनं खेचून घेऊन जाताना या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय. या महिलेला किडनॅप करून तिच्यावर बलात्कार करण्यात आलाय.
२५ मार्च रोजी ही घटना घडलीय. २४ वर्षांच्या या तरुणीला तिच्या ऑफिसच्या ठिकाणाहून दिवसाढवळ्या किडनॅप करण्यात आलं होतं. तिनं खूप आरडाओरडा केला पण तो व्यर्थ ठरला.
या घटनेनंतर पाच दिवसांनी या महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासणीत समोरच्याच एका दुकानात असलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाल्याचं समोर आलंय.