सीबीआयने पकडले पॉर्न व्हिडिओने कमाई करणारी टोळी

Updated: May 15, 2015, 04:26 PM IST
सीबीआयने पकडले पॉर्न व्हिडिओने कमाई करणारी टोळी  title=

 

बंगळुरू :  सोशल मीडिया, पॉर्न वेबसाइट्सवर आक्षेपार्ह एमएमएस लीक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास सीबीआयला यश मिळाले आहे. सीबीआयने छापा टाकून बंगळुरूच्या या टोळीच्या म्होरक्याला पकडले आहे. त्याच्याकडून सुमारे ५०० पॉर्न क्लिप जप्त केल्या आहेत. या क्लिप्समध्ये महिला आणि लहान मुलांना आक्षेपार्ह अवस्थेत दाखविण्यात आले आहेत. 

आतापर्यंत झालेल्या चौकशी नुसार ही टोळीचे जाळे पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकपर्यंत पसरले आहे. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला व्हॉट्सअॅप आणि इतर माध्यमातून लीक होणाऱ्या क्लिप्सची चौकशी करण्यास सांगितले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव कौशिक कुनार असे असून त्याच्याकडे सीबीआयला एडिटींग सॉफ्टवेअर, मशीन, कॅमरे आणि हार्ड डिस्क सारख्या वस्तू मिळाल्या आहेत. हा आरोपी अशा प्रकारच्या क्लिप्स साइट्सवर टाकून मोठी कमाई करीत होता. टोळीतील अन्य आरोपीची कौशिकमार्फत चौकशी सुरू आहे. 

हा युवक बंगळुरूच्या चांगल्या घरातील असून त्याला व्हिडिओच्या प्रति क्लिकच्या माध्यमातून चांगली कमाई करीत होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.