श्रीमंतांना पुरविण्यात येत होत्या परदेशी मुली

ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल. कारण श्रीमंतांसाठी परदेशी सुंदर तरुणी पुरविण्यात येत होत्या.  

Updated: Mar 29, 2016, 02:54 PM IST
श्रीमंतांना पुरविण्यात येत होत्या परदेशी मुली title=

भुवनेश्वर : श्रीमंतीचे चोकले खूप असतात, असे वाचण्यात आणि ऐकण्यात आले असेल तुमच्या. मात्र, ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल. कारण श्रीमंतांसाठी परदेशी सुंदर तरुणी पुरविण्यात येत होत्या. या विदेशी सेक्स रॅकेटचे भांडफोड झालेय.

पोलिसांनी ओडिशातील राजधानी भुवनेश्वर येथे परदेशी सेक्स रॅकेटची जाळे उद्धवस्त केलेय. पोलिसांनी किरगिझस्तानच्या एका महिलेला पकडले. ही महिला सेक्स रॅकेट चालवायची. याबाबत भुवनेश्वर पोलिसांनी नवी दिल्लीतील किरगिझस्तानच्या दुतावासशी संपर्क केला आणि या महिलेची माहिती घेतली. त्याआधी त्यांना एक आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट चालत असल्याचा संशय आला. त्यानुसार तपास सुरु केला.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शहरातील अलिशान फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट चालत होते. यात मोठे उद्योगपती, क्लबचे मेंबर्स तसेच इव्हेंट्स मॅनेजर यांना भुलविण्यासाठी परदेशातून मुली मागविल्या जात होत्या.

अटक करण्यात आलेली महिला परदेशी मुलींच्या बदल्या श्रीमंताकडून ज्यादा पैशाची मागणी होत असे. तसेच पोलिसांनी अन्य दोघांना अटक केलेय. भुवनेश्वरमध्ये पकडण्यात आलेली महिला गोवा, कोलकाता, बंगळुरु येथेही गेलेली आहे. हे सेक्स रॅकेट टुरिस्ट व्हीसावर परदेशी मुली भारतात आणल्या जायच्या. याबदल्यात मोठ्या रक्कमेची लालूच दाखविली जायची. या रॅकेटमध्ये देशातील मुलींचाही समावेश असल्याचे दिसून येत आहे. ज्या फ्लॅटमध्ये हे चालत होते, त्या फ्लॅटच्या मालकाला नोटीस बजावण्यात आलेय.