गायिकेवर दिराने आणि सासऱ्याने केला बलात्कार

८ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका भोजपुरी गायिकेला नरकयातना सहन कराव्या लागल्या. लग्नानंतर पैशांसाठी तिचा छळ केला गेला. तिला उपाशी ठेवलं गेलं. त्यानंतर सासरच्या लोकांना कंटाळून माहेरी परतल्यावर पुन्हा त्रास देणार नाही असं सांगत तिला सासरच्या लोकांनी पुन्हा घरी आणलं.

Updated: Dec 6, 2015, 03:37 PM IST
गायिकेवर दिराने आणि सासऱ्याने केला बलात्कार title=

नवी दिल्ली : ८ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका भोजपुरी गायिकेला नरकयातना सहन कराव्या लागल्या. लग्नानंतर पैशांसाठी तिचा छळ केला गेला. तिला उपाशी ठेवलं गेलं. त्यानंतर सासरच्या लोकांना कंटाळून माहेरी परतल्यावर पुन्हा त्रास देणार नाही असं सांगत तिला सासरच्या लोकांनी पुन्हा घरी आणलं.

घरी आणल्यानंतर सासरच्या लोकांनी तिला दिवसभर मारहाण केली. त्यांनतर दिराने आणि सासऱ्य़ाने तिच्यावर तिच्या पती समोर बलात्कार केला.

रात्रीच्या वेळी संधी मिळताच पिडितेने तेथून पळ काढला आणि पुन्हा इलाहाबाद येथे माहेरी परतली. त्यानंतर तिने सासरच्या लोकांविरोधात बलात्कार, हुंड्यासाठी छळ, मारहाणीची तक्रार केली.

'फेसबुक प्रोफाईल पाहुन आशिष खरे या व्यक्तीने स्वत: लग्नाची मागणी घातली. माझ्याकडे 7 गाड्या, 3 बंगले आणि करोडोची संपत्ती असल्याचं सांगून फसवणूक केल्याचा आरोप' मुलीच्या पित्याने केला आहे. 

पोलिसांनी पती, सासरा, दिर, नौकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांची एक टीम ही दिल्ली येेथे प्रकरणाच्या चौकशीसाठी रवाना झाली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.