कानपूर : कानपूरच्या ग्रामीण भागातील डेरापूर भागात मंगळवारी दोन दिवसांपूर्वी आलेल्या नवरी मुलगी आई झाल्यानंतर गावात गोधळाची परिस्थिती होती. नवऱीने एका मुलीला जन्म दिला.
बातमी पसरल्यानंतर वाद निर्माण झाला, तडकाफडकीने मुलीच्या परिवारांना बोलवण्यात आले. अनेक तास सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या बैठकीनंतर हे लग्न रद्द करण्यात आले. तसेच नवऱ्या मुलीचे सर्व सामान परत देण्यात आले.
३१ मे रोजी सब्दलपूर येथील युवकाचे झींझक खेमला गावातील मुलीशी लग्न झाले. २० वर्षांच्या वधुचे अचानक पोट दुखायला लागले. त्यानंतर महिलांमध्ये चर्चा सुरू झाली.
नव्या सूनेला हॉस्पिटलमध्ये नेण्याची तयारी सुरू होती तेव्हा तीने एका मुलीला जन्म दिला. शेजारच्या गावांमध्ये ही बातमी आगीसारखी पसरली. नव्या नवरीचा पतीही बेशुद्ध झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.