आठ राज्यांमधील पोटनिवडणुकीतही भाजपची लाट

आठ राज्यातील विधानसभेच्या १० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपची लाट पाहायला मिळाली.

Updated: Apr 13, 2017, 02:17 PM IST
आठ राज्यांमधील पोटनिवडणुकीतही भाजपची लाट title=

नवी दिल्ली : आठ राज्यातील विधानसभेच्या १० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपची लाट पाहायला मिळाली. दिल्लीच्या राजौरी गार्डन मतदारसंघातून भाजप -अकाली पक्षाचे उमेदवार मनजिंदर सिंह सिरसा यांचा विजय झाला आहे. तर हिमाचल प्रदेशच्या भोरंज मतदारसंघातून आणि असामच्या धीमाजी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. मनजिंदर सिंह सिरसा यांनी १४,६५२ मतांनी विजय मिळवला. आम आदमी पक्षाचे उमेदवाराचं येथून डिपॉजिट जब्त झालं.

१० विधानसभेच्या जागांचा निकाल

राजौरी गार्डन, दिल्ली - भाजप विजयी
बांधवगढ, मध्यप्रदेश - भाजप विजयी
भोरंज, हिमाचल प्रदेश - भाजप विजयी
भीमाजी, असाम - भाजप विजयी
नंजनगुड, कर्नाटक - काँग्रेस विजयी
गुंडलुपेट, कर्नाटक - काँग्रेस विजयी
अटेर, मध्यप्रदेश - भाजप पुढे
कांथी दक्षिण, पं. बंगाल - टीएमसी पुढे
धौलपूर, राजस्थान -  भाजप पुढे
लिट्टीपाडा, झारखंड - जेएमएम पुढे