मशिदीच्या शाही इमामाचा मोदींविरोधात फतवा जारी

टीपू सुल्तान मशिदीचे शाही इमाम नरून रहमान बरकती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जारी केलेल्या फतव्यानं साऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापची लाट पसरली आहे. सात जानेवारीला इमाम बरकती यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार इद्रीस अली यांच्या उपस्थितीमध्ये मोदींविरोधात फतवा जारी केला. त्या फतव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार करणाऱ्याला 25 लाख रुपयांचं बक्षीस घोषित करण्यात आलं आहे. शिवाय भाजपचे कार्यकर्ते दिलीप घोष यांच्यावर दगडफेक करून त्यांना राज्याबाहेर हाकला असाही उल्लेख फतव्यात करण्यात आला. 

Updated: Jan 12, 2017, 10:46 AM IST
मशिदीच्या शाही इमामाचा मोदींविरोधात फतवा जारी title=

कोलकाता : टीपू सुल्तान मशिदीचे शाही इमाम नरून रहमान बरकती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जारी केलेल्या फतव्यानं साऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापची लाट पसरली आहे. सात जानेवारीला इमाम बरकती यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार इद्रीस अली यांच्या उपस्थितीमध्ये मोदींविरोधात फतवा जारी केला. त्या फतव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार करणाऱ्याला 25 लाख रुपयांचं बक्षीस घोषित करण्यात आलं आहे. शिवाय भाजपचे कार्यकर्ते दिलीप घोष यांच्यावर दगडफेक करून त्यांना राज्याबाहेर हाकला असाही उल्लेख फतव्यात करण्यात आला. 

याप्रकरणी खासदार इद्रीस अली यांच्यासह शाही इमामांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. पण इमाम बरकत अली ममता बॅनर्जींच्या अत्यंत महत्वाच्या सल्लागारांपैकी एक असल्यानं त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप आता भाजपनं केलाय. एस्सेल समूहाचे प्रमुख आणि खासदार सुभाष चंद्रा यांनीही इमाम बरकती यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.