मुख्यमंत्री निवडीसाठी व्यंकैय्या नायडू आणि भूपेंद्र यादव यांची नियुक्ती

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डानं व्यंकैय्या नायडू आणि भूपेंद्र यादव यांची नियुक्ती केलीय. रविवारी संध्याकाळी झालेल्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली.  बैठकीत उत्तराखंडचे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि सरोज पांडे पर्यावेक्षक नेमण्यात आलेत. लवकरच या दोन्ही राज्यातल्या आमदारांची बैठक होईल..त्यातच मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत निर्णय होईल.

Updated: Mar 13, 2017, 02:32 PM IST
मुख्यमंत्री निवडीसाठी व्यंकैय्या नायडू आणि भूपेंद्र यादव यांची नियुक्ती title=

नवी दिल्ली : उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डानं व्यंकैय्या नायडू आणि भूपेंद्र यादव यांची नियुक्ती केलीय. रविवारी संध्याकाळी झालेल्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली.  बैठकीत उत्तराखंडचे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि सरोज पांडे पर्यावेक्षक नेमण्यात आलेत. लवकरच या दोन्ही राज्यातल्या आमदारांची बैठक होईल..त्यातच मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत निर्णय होईल.

पर्यवेक्षक दिल्लीत येऊन बैठकीचा वृत्तांत देतील. त्यानंतर अमित शाहा मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करतील असं केंद्रीय मंत्री जे पी नड्डयांनी बैठकीनंतर जाहीर केलं.  उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा आणि उत्तरप्रदेशात भाजपचे अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांची नावं स्पर्धेत आहेत. या दोघांपैकी एकाच्या नावावर शिक्का मोर्तब होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे...येत्या 16 मार्चला दोन्ही राज्यात भाजपच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात येईल असंही सूत्रांचं म्हणणं आहे.