रुग्णालयातल्या आगीच्या बळींची संख्या २२ वर, पंतप्रधानांनी घेतली दखल

ओडिशात भुवनेश्वरमधील एसयूएम या खासगी रुग्णालयात लागलेल्या आगीत २२ जणांचा मृत्यू झालाय तर या दुर्घटनेत ४० जण गंभीर जखमी झालेत.

Updated: Oct 18, 2016, 08:20 AM IST
रुग्णालयातल्या आगीच्या बळींची संख्या २२ वर, पंतप्रधानांनी घेतली दखल title=

भुवनेश्वर : ओडिशात भुवनेश्वरमधील एसयूएम या खासगी रुग्णालयात लागलेल्या आगीत २२ जणांचा मृत्यू झालाय तर या दुर्घटनेत ४० जण गंभीर जखमी झालेत.

रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील डायलेसिस विभागात सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही आग लागली. या आगीत श्वास गुदमरुन अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

शार्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय. रात्री उशिरा या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आलंय.

या आगीच्या घटनेप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दिलेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करुन या घटनेबाबत दुःख व्यक्त केलंय. 

आगीत जखमी झालेल्या रुग्णांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश मोदींनी या ट्विटमधून दिलेत.