त्या बंटी-बबलीपासून सावध राहा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाला अभिनेता आणि भाजप खासदार परेश रावलनं पाठिंबा दिला आहे.

Updated: Nov 19, 2016, 10:26 PM IST
त्या बंटी-बबलीपासून सावध राहा! title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाला अभिनेता आणि भाजप खासदार परेश रावलनं पाठिंबा दिला आहे. मोदींनी नोटबंदी केल्यामुळे काही पक्षांना जास्तच त्रास होत आहे. जनतेला होणाऱ्या त्रासासाठी हे नेते विरोध करत नाहीयेत तर त्यांच्याकडे असणारा काळा पैसा एका दिवसात कचरा झाला आहे, रद्दी झाली आहे म्हणून हा विरोध होत असल्याचा आरोप परेश रावलनं केला आहे.

यातले काही बंटी आणि बबली जनतेला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. या बंटी-बबलीपासून सावध राहा असा सल्ला परेश रावलनं दिला आहे. आता हे बंटी आणि बबली कोण हे मात्र परेश रावलनं सांगितलं नाही. परेश रावलनं त्याच्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

पाहा काय म्हणाला परेश रावल