www.24taas.com,बेळगाव
बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत मराठी भाषकांच्या एकजुटीला यश आलंय. महाराष्ट्र एकीकऱण समितीला ३२जागांसह स्पष्ट बहुमत मिळाल्यानं बेळगाव महापालिकेवर मराठीचा झेंडा फडकलाय.
या निवडणुकीत मात्र महापौर मंदा बाळकुंद्री आणि उपमहापौर रेणू किल्लेकर यांचा पराभव झालाय. विशेष म्हणजे मराठी उमेदवारांनीच दोघांचाही पराभव केलाय. ५८ जागांच्या महापालिकेत ३२ जागा महाराष्ट्र एकीकरण समितीला मिळाल्या आहेत. तर कन्नड भाषिकांना १८ जागा मिळाल्या आहेत. उर्दु भाषिकांना ६ जागा मिळाल्या आहेत. अजून चार जागांचा निकाल लागलेला नाही.
बेळगाव पालिका निवडणूक निकाल
-वार्ड क्रमांक ५ मधून - संभाजी पाटील. सलग पाचव्यांदा विजयी
-वॉर्ड क्रमांक २३ मधून - ज्योती चोपडे
-वार्ड क्रमांक ६मधून विनायक गुंजटकर ,
-वार्ड क्रमांक १६ - विजय लक्ष्मण पाटील,
-वार्ड क्रमांक ४६ -व्ही. लोकेश,
-वार्ड क्रमांक २६ - मेघा हळदणकर.
-वार्ड क्रमांक ४१ - सरला येरेकर
-वार्ड क्रमांक २मधून - रुपाली नेसरकर,
-वार्ड क्रमांक २२मधून रवी धोत्रे,
-वार्ड क्रमांक ५१- बंदे नवाज बाळेकुंद्रे.
-वार्ड क्रमांक १७- पंढरी परब,
-वार्ड क्रमांक ५२मधून दिनेश नाखिपुरी,
-वार्ड क्रमांक २७मधून वैशाली उलगी
-वार्ड क्रमांक ३६ मधून बाबूलाल मुजावर