ओबामा यांचं लवकरच भारतात आगमन

जगात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं काही वेळाने भारतात आगमन होणार आहे. 

Updated: Jan 25, 2015, 09:12 AM IST
ओबामा यांचं लवकरच भारतात आगमन title=

नवी दिल्ली : जगात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं काही वेळाने भारतात आगमन होणार आहे. 

बराक ओबामा यांच्या स्वागतासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखिल उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दिल्लीतील पालम एअरपोर्टवर बराक ओबामा यांचं आगमन होणार आहे.

बराक ओबामा यांचं एअर फोर्स वन हे विमान सकाळी दहा वाजता दिल्लीत लँड होणार आहे. बराक ओबामा यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्ठा ठेवण्यात आली आहे.

बराक ओबामा यांचा हा तीन दिवसीय भारतदौरा आहे. बराक ओबामा यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा देखिल उपस्थित राहणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.