SMS अलर्टसाठी बँका घेतायत सक्तीचं शुल्क!

एटीएममधून पैसे काढलेत किंवा कार्ड वापरुन केली खरेदी... तुमच्या मोबाईलवर बँकेचा एसएमएस येतो. पण आता या सेवेसाठी बँका ग्राहकांकडून सक्तीची वसुली करतांना दिसतायेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 27, 2013, 10:26 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
एटीएममधून पैसे काढलेत किंवा कार्ड वापरुन केली खरेदी... तुमच्या मोबाईलवर बँकेचा एसएमएस येतो. पण आता या सेवेसाठी बँका ग्राहकांकडून सक्तीची वसुली करतांना दिसतायेत.
सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँकांसह अनेक खासगी बँका एसएमएस अलर्टसाठी ग्राहकांकडून वर्षाला सक्तीची शुल्क वसुली करू लागल्या असल्याची माहिती अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी संसदेत दिली. एसएमएस अलर्टसाठी स्टेट बँक ६० रुपये तर कॅनरा बँक वर्षाला १०० रुपये शुल्क वसूल करू लागली आहे. तर आयडीबीआय आणि विजया बँक या २०१०-११ पासूनच एसएमएस अलर्टसाठी ग्राहकांकडून शुल्क वसुली करतात.
हे असं आहे, मात्र याची माहिती ग्राहकांना आहे का? आम्ही ग्राहकांना शुल्क आकारणीचा एसएमएस पाठवला होता. मात्र अनेकांकडून त्याचं काहीच उत्तर आलं नाही. त्यामुळं ती त्यांची सहमती समजून त्यांना सेवा सुरू करण्यात आली असल्याचा बहुतांश बँकांचं म्हणणं आहे.
मोबाईल सेवा कंपन्यांनी बल्क एसएमएसचा दर दोन पैसे प्रति एसएमएसवरून वाढवून २० पैसे प्रति एसएमएस केल्यामुळं ही सेवा मोफत देणं अशक्य झालं असल्याचं, एका बँकेच्या अधिकार्यापनं सांगितलं. मात्र ही सेवा घ्यायची की नाही, हे ग्राहकांवर अवलंबून असल्याचंही बँकांकडून सांगण्यात येतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.