नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये व्यवहार सुरू...

जुन्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये व्यवहार आजपासून सुरू झाले आहेत.

Updated: Nov 10, 2016, 12:34 PM IST
नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये व्यवहार सुरू...  title=

मुंबई : जुन्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये व्यवहार आजपासून सुरू झाले आहेत.

८ नोव्हेंबरला मध्यरात्रीपासून पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. ज्यांच्याकडे या नोटांमध्ये रोख रक्कम आहे त्यांना ही रक्कम बँका आणि पोस्ट ऑफिसममध्ये बदलून चलनात असणाऱ्या नोटांमध्ये आजपासून बदलून मिळत आहेत.

चलनी नोटांची कमतरता होऊ नये म्हणून ५०० आणि २०००च्या नव्या नोटाही आजपासून चलनात येत आहेत. शिवाय शंभर आणि त्या खालच्या नोटांचीही वाढीव छपाई करण्यात आलीय. शिवाय नोटा बदलण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन येत्या शनिवारी आणि रविवारी बँका उघड्या राहणार आहेत.

नोटांच्या अदलाबदलीला जाण्यासाठी काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा...

* आज बँका आठ वाजल्यापासून खुल्या राहणार आहेत.

* शिवाय या आठवड्यात शनिवार आणि रविवारीही काम सुरू राहणार असल्याचं अनेक बँकांनी जाहीर केलंय.

* प्रत्येकाला केवळ ४ हजारांची रक्कम बदलून मिळेल, इतर रक्कम खात्यावर वळती होईल

* नोटा बदलताना कोणतीही वजावट होणार नाही, त्यामुळे भूलथापांना बळी पडू नका

* सोबत ओळखपत्र किंवा पँनकार्ड घेऊन जा

* खाते नसल्यास नवे खाते उघडता येईल

* मित्र किंवा नातलगाच्या खात्यावर पैसै टाकता येतील मात्र त्यासाठी त्यांची लेखी परवानगी आवश्यक आहे.