नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर मोदी सरकारकडून कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी जागरुकता पसरवली जातेय. यासाठी आता सरकारने २ लाखाहून अधिक रुपयांच्या रोख देवाणघेवाणीवर दंड ठरवलाय.
नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्या नते भारतात डिजिटल देवाणघेवाण, मोबाईल वॉलेट्स आणि बायोमेट्रिक माध्यमे वाढल्याने लवकरच एटीएम, क्रेडिट, डेबिट कार्डवरुन देवाणघेवाण संपेल.
देशात डिजिटल देवाणघेवाणीला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे फिजीकल बँकिंग जवळपास संपत आलीये. यामुळे पुढील तीन ते चार वर्षात डिजीटल देवाणघेवाण ही मोबाईल वॉलेट आणि बायोमेट्रिक पद्धतीनेच होईल. एटीएम, क्रेडिट, डेबिट कार्ड कालबाह्य होतील, असे अमिताभ म्हणाले.