जयपूर : राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात अजीतगड येथे एटीएममधून पाचपट पैसे आल्याने लोकांची पैसे काढण्यासाठी गर्दी उसळली. एटीएममधून १०० रुपयांऐवजी ५०० च्या नोटा येऊ लागल्या. तर ५०० ऐवजी १०००च्या नोटा येऊ लागल्यात. ही बातमी समजतात याठिकाणी चक्क रांग लागली.
अॅक्सिस बॅंकेच्या एका एटीएम मशिनमधून पैसे काढण्यासाठी एक जण गेला असता त्याने १०० रुपये काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला चक्क ५०० रुपये मिळालेत. तर दुसऱ्याने ५०० रुपये काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला १००० रुपये मिळालेत. हे वृत्त समजताच त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी गर्दी उसळली.
अजीतगड येथील बस स्टॅंड येथे अॅक्सिस बॅंकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये नजर चुकीने नोटा ठेवण्याच्या ठिकाणी अदलाबद्दल झाली. १०० रुपयांच्या नोटाच ठेवण्यात आल्या नाहीत. १००च्या ठिकाणी ५०० तर ५००च्या ठिकाणी १०००च्या नोटा ठेवण्यात आल्याने गोंधळ उडाळा.
याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी एटीएमला ठाळे मारले आणि संबंधित बॅंकेच्या व्यवस्थापनाला कळविले. मात्र, तोपर्यंत किती पैसे काढले याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. दरम्यान, बॅंकेने ज्याच्याकडून चुकी झालेय. त्याच्याकडून रक्कम वसूल न करण्याचा निर्णय घेतलाय.