www.24taas.com, नवी दिल्ली
ज्येष्ठ समावसेवक अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील दुरावा वाढतच आहे. टीम अण्णा फुटण्यासाठी अण्णांनी अरविंद केजरीवाल यांना दोषी ठरविले आहे. राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या मुद्यावरुन भ्रष्टाचारविरोधी आंदोलन मागे पडले आणि सदस्य विखुरले, असे अण्णांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहीले आहे.
काही दिवसांपूर्वीच अण्णा हजारे यांनी टीम अण्णा बरखास्त केली होती. तर राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या मुद्यावरुन अरविंद केजरीवाल आणि आपला मार्ग वेगळा असल्याचे स्पष्ट केले होते. त्यासंदर्भात अण्णांनी ब्लॉगवर लिहीले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून युपीए सरकारने भ्रष्टाचारविरोधातील आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न चालविले होते.
परंतु, त्यांना यश मिळाले नाही. मात्र, आंदोलन विखुरल्या गेले ते सरकारच्या कोणत्याही प्रयत्नाविना. एका गटाचा राजकारणात जाण्याचा निर्णय यास कारणीभूत ठरला.