www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दोषी खासदार आणि आमदारांना पाठिशी घालणारं विधेयकावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. जर, हे विधेयक चुकीचं आहे असं राहुल गांधींन वटातंय तर हे विधेयक आणणाऱ्या सरकारमधील लोकांनी राजीनामा दिला पाहिजे, असं विरोधी पक्षाचे नेते अरुण जेटली यांनी म्हटलंय.
‘मी केवळ एव्हढंच सांगू शकतो की बाष्कळ गोष्टींचा काँग्रेसला या गोष्टीचं खूप उशीरा पत्ता लागलाय. जर खंरच काँग्रेस पक्षाला हे विधेयक चुकीचं वाटतंय तर ज्या लोकांनी हे विधेयक एका महिन्याच्या आतच देशाच्या समोर मांडलंय त्यांनी स्वत:च पदावरून दूर व्हावं’.
दोषी नेत्यांना वाचविण्यासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाला फाडून फेकला पाहिजे, अशी सरकार विरोधी भूमिका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतीच मांडली होती. यावर प्रतिक्रिया देताना मोईली म्हणतात, जर हे विधेयक आणणाऱ्यांनी राजीनामे दिले नाहीत तर याचा अर्थ असाच होतो की हा काँग्रेसचा केवळ दिखावा आहे’.
सोबतच, ‘सरकार चुका करतं, बाकी सगळं जग चुका करतं मात्र काँग्रेसचं प्रथम कुटुंब मात्र चुका करत नाही, असा याचा अर्थ असू शकतो’ असं म्हणत म्हणत मोईलींनी नेहरु-गांधी घराण्याची फिरकीही यावेळी घेतली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.