मोदींच्या भाषणादरम्यान जेटली, पर्रिकर, केजरीवालांना डुलकी

देशाच्या ७०व्या स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधत  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लाल किल्ल्यावरुन भाषण दिले. संपूर्ण देशवासीय हे भाषण ऐकत होते. तब्बल दीड तास त्यांचे भाषण सुरु होते. या भाषणात त्यांनी सरकारने दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली. 

Updated: Aug 15, 2016, 04:00 PM IST
मोदींच्या भाषणादरम्यान जेटली, पर्रिकर, केजरीवालांना डुलकी title=

नवी दिल्ली : देशाच्या ७०व्या स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधत  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लाल किल्ल्यावरुन भाषण दिले. संपूर्ण देशवासीय हे भाषण ऐकत होते. तब्बल दीड तास त्यांचे भाषण सुरु होते. या भाषणात त्यांनी सरकारने दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली. 

मात्र या भाषणादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल डुलकी घेताना दिसले. त्यांचे हे फोटो सध्या व्हायरल होतायत.

मोदींनी तब्बल दीड तास भाषण केले. यावेळी त्यांनी सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोगा मांडला. मोदींचे भाषण ऐकण्यासाठी लाल किल्ल्यावर सर्व नेतेमंडळी तसेच मोठ्या संख्येने लहान मुले आणि नागरिक उपस्थित होते.

मोदींच्या या लांबलचक भाषणादरम्यान जेटली, पर्रिकर आणि केजरीवाल यांना झोप काही आवरली नाही आणि डुलकी घेताना त्यांचे फोटो कॅमेऱ्यात कैद झाले. सध्या सोशल मीडियावर या फोटोंची चर्चा जोरात सुरु आहे.