`अम्मा`चं मीठ, भाजीपाला आणि जेवणंही स्वस्त

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आता `अम्मा मीठ` सुरू केलं आहे.

Updated: Jun 12, 2014, 06:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आता `अम्मा मीठ` सुरू केलं आहे. यानुसार लोकांनी कमी किंमतीत मीठ मिळणार आहे. हे एक राजकीय दृष्टीकोनातून टाकण्यात आलेलं पाऊल असल्याची सांगण्यात येतंय.
वाचा अम्मांचा स्वस्ताईचा महिमा
मीठावरून काही म्हणी आहेत, खालेल्या मिठाला जागणे, हमने आपका नमक खाया है. या प्रकारची म्हण तामिळनाडूत आहे. यानुसार ज्याचं मीठ खाल्लं आहे, त्याच्याशी मरेपर्यंत प्रामाणिक असावं, अशी ती म्हण आहे.
अम्मा कॅन्टीन, अम्मा मिनरल वॉटर, अम्मा भाजीपाला
या आधी जयललिता यांनी अम्मा कँटीन आणि अम्मा मिनरल वॉटर आणि अम्मा भाजीची दुकानं सुरू केली आहेत.
अम्मा मीठाचे तीन प्रकार आहेत, डबल फोर्टिफाइंड, रिफ़ाइंड फ्री फ्लो आयोडाइज़्ड आणि लो सोडियम मीठ. बाजारात उपलब्ध असलेल्या इतर कंपन्यांपेक्षा हे मीठ कमी किमतीत मिळतं, या सहा ते दहा रूपयांचा यात फरक दिसून येतो.
अम्मा हा मोठा ब्रॅण्ड
अम्मा हा मोठा ब्रॅण्ड सध्या झाला आहे, आणि अम्मा हा शब्द सहज लक्षात राहत असल्याने लोकप्रिय झाला आहे. जयललिता यांनी मीठच नाही, तर त्यांनी सुरू केलेल्या कॅन्टीनमध्ये इडली एक रूपयाला मिळते.
सांबर राईस, लेमन राईस आणि पोंगल पाच पाच रूपयाला मिळतं, दही राईस तीन रूपयाला देण्यात येतो, ही किंमत इतर हॉटेल्सच्या मानाने अतिशय कमी आहे.
डिझेल महागलं तर पाणी विकून तोटा भरून काढला
अम्मा मिनरल वॉटरची एक लीटरची बाटली 10 रूपयांना मिळते, ही सोय फक्त राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्टॉपवर उपलब्ध आहे. हा कारखाना पालार नदीनजीक असलेल्या छोट्याशा भूखंडावर आहे.
महामंडळाला होणार नुकसान कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, डिझेल महागल्याने परिवहन मंडळाला बसणारा फटका, कमी करण्यासाठी पाणी विकून भर काढणे, या पेक्षा मोठी कल्पना असू शकते का? हा प्रश्न पडतो. यामुळे परिवहन मंडळाची भाडेवाढ ही फार कमी होतेय.
निवडणुकीत लॅपटॉप वाटण्याचा काळ इतिहास जमा
अम्मा दुकानावर भाजीपालाही कमी किमतीत विकला जातो. महागाई या मोठा मुद्दा जयललिता यांच्या ध्यानात आला आहे,
महागाई वाढत असेल तर आपण काय स्वस्त देऊ शकू, जास्तच जास्त वस्तू स्वस्त देण्यावर त्यांचा भर आहे, निवडणुकीत लॅपटॉप आणि त्यापूर्वी टीव्ही वाटण्याचा काळ आता इतिहास जमा झाल्याचं जयललिता यांनी ओळखलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.