कॅप्टन अमरिंदर यांना १६ मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ

कॅप्टन अमरिंदर सिंग येत्या १६ मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 13, 2017, 12:28 AM IST
कॅप्टन अमरिंदर यांना १६ मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ title=

चंदीगढ : काँग्रेसचे अमरिंदर सिंग काँग्रेसचे नवे मुख्यमंत्री असतील. काँग्रेसने पंजाबमध्ये अभूतपूर्व विजय मिळविल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग येत्या १६ मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या राज्यपालाची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला. याबाबत बोलताना अमरिंदरसिंग म्हणाले, 'आम्ही राज्यपालांना भेटलो. आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे दावा केला. त्यासाठी १६  मार्च ही तारीख निश्‍चित करण्यात आली.'

काँग्रेसने पंजाबमध्ये एकूण १७७ जागांपैकी तब्बल ७७  जागांवर विजय मिळवित एकहाती सत्ता मिळविली आहे. तब्बल एक दशकानंतर पंजाबमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आली आहे. आप'ला केवळ 20 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपला पंजाबमध्ये प्रभाव दाखवता आला नाही. शिरोमणी अकाली दल आणि भाजप या युतीला केवळ १८ जागांवर विजय मिळाला.