आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांना अखेर अटक

प्रक्षोभक भषण दिल्याप्रकरणी हैदराबादेत एमआयएमचे वादग्रस्त आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांना अखेर अटक करण्यात आली आहे. 24 डिसेंबरला ओवेसी यांनी हिंदू धर्मियांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी दाखल झाल्यानंतर, अकबरुद्दीन ओवेसी इंग्लंडमध्ये परागंदा झाले होते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 8, 2013, 11:18 PM IST

www.24taas.com, हैदराबाद
प्रक्षोभक भषण दिल्याप्रकरणी हैदराबादेत एमआयएमचे वादग्रस्त आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांना अखेर अटक करण्यात आली आहे. 24 डिसेंबरला ओवेसी यांनी हिंदू धर्मियांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी दाखल झाल्यानंतर, अकबरुद्दीन ओवेसी इंग्लंडमध्ये परागंदा झाले होते.
त्यानंतर पोलिसांच्या मदतकार्यात सहकार्य करत नसल्याप्रकरणी त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. इंग्लंडहून हैदराबादेत परतलेल्या ओवेसीने प्रकृती अस्वास्थ्याचं कारण दिलं होतं. त्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्येच अटक करण्यात आली.
ओवेसी यांच्या अटकेच्या बातमीने शहरात तणाव निर्माण झाला होता. त्यांच्या समर्थकांनी शहरात काही ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. आणि हॉस्पिटलबाहेरही समर्थकांची खूप गर्दी होती. पण पोलिसांनी सुरक्षेची पूर्ण तयारी केली होती आणि ओवेसींना अखेर अटक करण्यात आली.