नवी दिल्ली : भारती एअरटेल कंपनीने आपल्या देशभरातील प्रीपेड ग्राहकांना प्रति सेकंदाप्रमाणे बिल देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने दावा केला आहे की, यामुळे ग्राहकांना फक्त तेवढेच पैसे द्यावे लागतील, जेवढा वेळ ते नेटवर्कचा वापर करतील.
कंपनी अशा वेळी हे पाऊल उचललं आहे. ज्यावेळी टेलिकॉम क्षेत्रात कॉल ड्रॉपसाठी वाद सुरू आहेत. दूरसंचार नियामक ट्रायकडून कॉल ड्रॉपची चौकशी सुरू आहे. एअरटेलने हे पाऊल उचलल्याने स्पर्धक कंपन्यांना देखील ही सुविधा द्यावी लागण्याची शक्यता आहे.
एअरटेलचे ९४ टक्के ग्राहक हे प्रीपेड आहेत, तसेच लवकरच कंपनीचे जास्तच जास्त ग्राहक हे पर सेकंद बिलांची सेवा वापरतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.