एअर इंडिया स्फोट प्रकरणातील दोषीची मुक्तता

एअर इंडियाच्या कनिष्क विमानात १९८५ मध्ये झालेल्या स्फोटातील एकमेव दोषी इंद्रजीत सिंग रेयातची कॅनडाच्या तुरुंगातून मुक्तता करण्यात आलीये.

Updated: Jan 28, 2016, 10:02 AM IST
एअर इंडिया स्फोट प्रकरणातील दोषीची मुक्तता title=

टोरंटो : एअर इंडियाच्या कनिष्क विमानात १९८५ मध्ये झालेल्या स्फोटातील एकमेव दोषी इंद्रजीत सिंग रेयातची कॅनडाच्या तुरुंगातून मुक्तता करण्यात आलीये. पॅरोल बोर्ड ऑफ कॅनडाच्या प्रवक्त्यांनी या बातमीला दुजोरा दिलाय. 

१९८५ मध्ये विमानात झालेल्या स्फोटात सर्व ३२९ प्रवासी ठार झाले होते. २००३ मध्ये रिपुदमन सिंग मलिक आणि अजायब सिंग बागरी यांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात खोटी साक्ष दिल्याप्रकरणात २०१० मध्य दोषी ठरवण्यात आले होते. 

एअरइंडियाचे हे विमान मॉन्ट्रियल, कॅनडाहून लंडन, मग ब्रिटनहून पुन्हा भारतच्या दिशेने येत होते. जेव्हा हे विमान लंडनच्या विमानतळाच्या दिशेने जात होते त्यावेळी आर्यलंडच्या किनाऱ्यावर पहिला स्फोट झाला. दुसरा स्फोट जपानच्या नरीतो विमानतळावर झाला. यात सामान उचलणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. 

रेयातला खोटी साक्ष दिल्याप्रकरणी २०११ मध्ये नऊ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. कॅनडाच्या पॅरोल बोर्डाच्या नियमानुसार रेयातची सुटका झाली असली तरी त्याच्यावर नजर ठेवण्यात येणार आहे.