अग्नी-५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

संपूर्ण स्वदेशी बनवटीच्या अग्नी-५ या क्षेपणास्त्राची आज सकाळी यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशाच्या किनारपट्टीवरील व्हीलर्स आयलंड या क्षेपणास्त्राचे चाचणी घेण्यात आली. 

Updated: Jan 31, 2015, 08:22 PM IST
 अग्नी-५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी title=

बालासोर : संपूर्ण स्वदेशी बनवटीच्या अग्नी-५ या क्षेपणास्त्राची आज सकाळी यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशाच्या किनारपट्टीवरील व्हीलर्स आयलंड या क्षेपणास्त्राचे चाचणी घेण्यात आली. 

जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या अग्नी-५ या आंतरखंडीय अण्वस्त्रवाहू क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र ५००० किलोमीटरचा पल्ला गाठून लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. 

एकात्मिक चाचणी क्षेत्राच्या (आयटीआर) प्रक्षेपक तळ क्रमांक चार येथून दूरप्रक्षेपकाच्या साह्याने सकाळी ८.०६ वाजता अग्नी-५ चे प्रक्षेपण करण्यात आले, अशी माहिती आयटीआरचे संचालक एमव्हीकेव्ही प्रसाद यांनी दिली.

विविध रडार आणि नेटर्वक सिस्टीम्सवरून संपूर्ण तपशील मिळाल्यानंतर सविस्तर परिणाम समजतील, असे त्यांनी सांगितले. भारताची मोठी कामगिरी आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.