आईचा अश्लील व्हिडीओ पाहून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

आपल्या आईचा एका दुसऱ्या व्यक्तीसोबतचा अश्लील व्हि़डीओ पाहून मुलाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गाझियाबादमध्ये घडली. तसेच या व्हिडीओमुळे तिच्या मुलीचेही लग्न मोडण्याच्या वाटेवर आहे. 

Updated: Jan 3, 2016, 04:49 PM IST
आईचा अश्लील व्हिडीओ पाहून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न title=

गाझियाबाद : आपल्या आईचा एका दुसऱ्या व्यक्तीसोबतचा अश्लील व्हि़डीओ पाहून मुलाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गाझियाबादमध्ये घडली. तसेच या व्हिडीओमुळे तिच्या मुलीचेही लग्न मोडण्याच्या वाटेवर आहे. 

मुरादनगरमध्ये ही घटना घडलीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिन्याभरापूर्वी एका तरुणाने आपल्या आईचा अश्लील व्हिडीओ पाहून विष पित आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार त्या तरुणांस समजला. तसेच व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे या महिलेच्या मुलीचे लग्नही तिच्या सासरच्यांनी मोडले. दरम्यान, पोलिसांनी याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिलाय.