www.24taas.com, नवी दिल्ली
‘आम आदमी पार्टी’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अमेरिकेतल्या व्हार्टन इंडिया इकॉनॉमिक कॉन्फरन्समध्ये आमंत्रित करण्यात आलंय.
२३ मार्च रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केजरीवाल व्हार्टन इंडियाला उद्देशून भाषण करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे, याच दिवशी केजरीवाल अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसणार आहेत. व्हार्टन इंडियाकडून आमंत्रण मिळाल्याची माहिती खुद्द केजरीवाल यांनी दिलीय.
यापूर्वी अमेरिकेतील व्हार्टन बिझनेस स्कूलने प्रमुख वक्त्यां च्या यादीतून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. परंतू मोदींच्या नावावर निर्माण झालेल्या वादानंतर मोदींचं व्याख्यान व्हार्टनकडून वगळण्यात आलं होतं.
दरम्यान, नरेंद्र मोदींना दिलेलं आमंत्रण रद्द केल्यानं शिवसेना नेते सुरेश प्रभू तसंच अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ‘व्हार्टन इंडिया’मध्ये सहभाग घेण्यासाठी नकार दिलाय.