नवी दिल्ली : दिल्ली महापालिकेत झालेल्या दारूण पराभवानंतर आता आम आदमी पार्टीतले मतभेद आता चव्हाट्यावर येऊ लागलेत. पक्षाच्या स्थापनेपासून अरविंद केजरीवालांचे सहकारी असलेले कुमार विश्वास पक्षावर नाराज आहेत. ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे.
आपचे ओखलाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी विश्वास यांच्यावर टीका केली होती. विश्वास हे संघ-भाजपाचे एजंट असून पक्षामध्ये दुही माजवत असल्याचा आरोप खान यांनी केला होता. यामुळे व्यथित झालेल्या विश्वास यांनी आपली बाजू स्पष्ट केलीये.
आपल्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा पक्षाचा समन्वयक व्हायची बिलकूल इच्छा नाही. मात्र आपल्याविरुद्ध षड्यंत्र रचलं गेलं असून खान यांचा बोलवता धनी वेगळाच असल्याचा आरोप विश्वास यांनी केलाय.