मुंबई : जात प्रमाणपत्र आणि डोमेसाईल प्रमाणपत्र आधार कार्डला जोडावीत असा निर्णय केंद्र सरकारने पहिल्यांदाच घेतला आहे. त्याबरोबरच ही प्रमाणपत्रे शाळेत असतानाच विद्यार्थ्यांना देण्यात यावी अशीही तरतूद करण्यात आली आहे. याबाबत सर्व राज्यांना आदेश देण्यात आला आहे. पाचवी-सहावीच्या वर्गात असतांना ६० दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना ही प्रमाणपत्रे देण्यात यावीत.
का देण्यात आला असा आदेश
शिष्यवृत्ती देण्यात विलंब, त्याचप्रमाणे जात आणि डोमेसाईल प्रमाणपत्रे मिळवतांना होणाऱ्या खोळंब्यामुळे अनुसूचित जाती आणि जमातींच्या विद्यार्थ्यांना ही प्रमाणपत्रे शालेय वयातच मिळावीत असा उद्देश त्यमागे आहे. विद्यार्थ्यांची कागदपत्रे जमा करण्याची जबाबदारी शाळेच्या प्रमुखांची असेल. आधार क्रमांकासह ही प्रमाणपत्रे देण्याचा प्रयत्न करावा, असे केंद्र सरकारच्या कार्मिक व्यवहार मंत्रालयाने सांगितले आहे.