91 लाख नवे करदाते, नवी ऑपरेशन क्लीन मनी वेबसाईट सुरु

नोटाबंदीच्या निर्णयाला सहा महिने पूर्ण झाल्यावर देशाला 91 लाख नवे करदाते मिळाल्याचं अर्थमंत्री अरुण जेटलींनी स्पष्ट केलंय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 17, 2017, 12:09 PM IST
91 लाख नवे करदाते, नवी ऑपरेशन क्लीन मनी वेबसाईट सुरु title=

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयाला सहा महिने पूर्ण झाल्यावर देशाला 91 लाख नवे करदाते मिळाल्याचं अर्थमंत्री अरुण जेटलींनी स्पष्ट केलंय. जेटलींच्या हस्ते मंगळवारी ऑपरेशन क्लीन मनी नावाच्या वेबसाईट उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी ही माहिती जाहिर केली. 

या वेबसाईटच्या माध्यमातून अघोषित मालमत्तांच्या छडा लावण्यास मदत होणार आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जवळापास 23  हजार कोटींची अघोषित संपत्ती सापडल्याचंही यावेळी सरकारनं जाहीर केलं.  नोटाबंदीच्या निर्णयानंतर रोखीचे व्यवहारांमध्ये कमालीची घट झाली असून मोठे रोख व्यवहार करण्यासाठी लोक धाजावत नाहीत असंही जेटलींनी म्हटलंय.  

केंद्रीय प्रत्यक्ष कर प्राधिकारणानं आतापर्यंत 1 लाख लोकांविरोधात चुकवल्याप्रकरणी कारवाईची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण केलीय.  त्याचप्रमाणे कर चुकणाऱ्यांचे तीन गट तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी हाय रिस्क म्हणजे सर्वाधिक जोखीम असणाऱ्यांच्यामध्ये हे 1 लाख लोक येतात. 

ऑपरेशन क्लीन मनी ही मोहीम 1जानेवारीपासून सुरु करण्यात आलीय. त्या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 18 लाख नागरिकांनी केलेल्या संशयास्पद व्यवहारांबद्दल स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहेत. त्यापैकी सुमारे 9 लाख 72 हजार नागरिकांनी त्यांच्या व्यवहाराविषयी आवश्यक माहिती सरकारला पुरवली आहे.  त्या सर्वांविरोधातली  कारवाई तात्काळ थांबवण्याचे निर्देश आयकर विभागानं दिले आहेत.