हैदराबाद : ( प्रसाद भोसेकर, झी मीडिया) सलग ६८ दिवस चातुर्मासाचे उपास केल्यानंतर एका 13 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय. हैदराबादमधली ही घटना आहे. यानिमित्तानं अनेक प्रश्न समोर आलेत.
होती, वय होतं अवघं तेरा वर्षं... आराधनानं पवित्र चातुर्मासाचं व्रत केलं होतं. आणि त्यासाठी तिनं तब्बल ६८ दिवस उपास केला. पाण्याचा एक घोट आणि अन्नाचा एक कणही न खाता तब्बल 68 दिवस तिनं उपास केला.
हे व्रत तिनं पूर्ण केलं. पण उपास सोडल्यावर दोन दिवसांनी तिला त्रास व्हायला लागला. डिहायड्रेशनमुळे तिची तब्बेत अचानक बिघडली.
तिचं आतडं सुकून गेलं होतं आणि इतके दिवस उपाशी असल्यानं किडनीही निकामी झाली.
या घटनेनंतर आराधनाच्या कुटुंबीयांवर कारवाई करावी, अशी मागणी एका स्वयंसेवी संस्थेनं केलीय. आराधनाच्या कुटुंबीयांचा दागिन्यांचा व्यवसाय आहे. या व्यवसायात नुकसान होत होतं. ते थांबवण्यासाठीच तिच्या कुटुंबीयांनी तिचा बळी दिल्याचा या संस्थेचा आरोप आहे.
१३ वर्षांची चिमुरडी अंधश्रद्धेचा बळी ठरली. इतकं होऊनही तिच्या कुटुंबीयांना तिच्या इच्छाशक्तीचा अभिमान आहे.
१३ वर्षांची एक मुलगी दोन महिले काही खात नाही, त्याचं तिच्या आई-वडिलांना काही वाटत नाही... ती शाळेत जात असेल तर तिच्या शिक्षकांनाही काही वाटलं नाही.
दोन महिने हा जीवघेणा प्रकार सुरू होता आणि अखेर नको तेच झालं. कुठल्याही धर्माच्या श्रद्धांवर आणि विश्वासावर सवाल उपस्थित करण्याचा आमचा हेतू नाही. पण श्रद्धा, अंधश्रद्धा आणि कट्टरता यामध्ये पुसटशी सीमारेषा असते.
ही सीमारेषा ओलांडून आपण काय साधतोय. काय मिळवतोय आणि काय गमावतोय. याचं तारतम्य माणसानं सोडून दिलंय का..