नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात तीन तलाकवरच्या याचिकेवर सुनावणी सुरु झाली आहे. कोर्टाने साफ केलं आहे की ते फक्त तीन तलाकवर निर्णय देणार आहे. एकापेक्षा अधिक लग्नावर नाही. कोर्टाने हे देखील म्हटलं आहे की, तीन तलाकवर सुनावणी करतांना गरज पडली तर निकाह हलालवर देखील चर्चा करेल.
या याचिकेवर पाच न्यायाधिशांची टीम निकाल देणार आहे. ज्याची अध्यक्षता मुख्य न्यायाधीश जे.एस खेहर करत आहेत. याशिवाय कुरियन जोसफ, आर.एफ नरीमन, यू.यू ललित आणि अब्दुल नजीर हे देखील या टीममध्ये आहेत.
सुनावणी करणारे पाचही जज सिख, ईसाई, पारसी, हिंदू आणि मुस्लीम समुदायाचं प्रतिनिधित्व करत आहेत. सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर सुनावाई कोणतीही सुट्टी न घेता ११ ते १९ मे दरम्यान होणार आहे. कोर्टाने या प्रकरणात विविध पक्षांना प्रश्न देण्यास सांगितले होते. ज्यावर सुनावणी दरम्याने विचार केला जाणार आहे. यामध्ये केंद्र सरकारकडून चार प्रश्न विचारण्यात आले आहेत.
केंद्र सरकारचे प्रश्न
१. तलाक-ए-बिद्दत, निकाह हलाला, बहुविवाहची विवादित परंपरा भारतीय संविधानाच्या कलम 25(1) नुसार सुरक्षित आहे का ?
२. कलम 25(1) भारतीय संविधानांच्या भाग 3 आणि विशेषकरून 14 और 21 च्या अधीन आहे ?
३. पर्सनल लॉ संविधान्या कलम 13 नुसार कायदा आहे का ?
४. तलाक-ए-बिद्दत, निकाह हलाला, बहुविवाहची परंपरा भारतद्वारे हस्ताक्षरित आंतरराष्ट्रीय संधी आणि करारानुसार भारताच्या दायित्वाच्या अनुकूल आहे का ?
मोदी सरकारने म्हटलं होतं की, या प्रकरणाला राजकीय चष्म्यातून बघू नये. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, ते देशातील मुस्लीम मुलींना होणाऱ्या त्या त्रासाविरोधात लढणार. सोबतच त्यांची सरकार या जुन्या कायद्याला संपवणार.