बुंदेलखंडमध्ये सापडली ४००० कोटींची संपत्ती!

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये साधूच्या स्वप्नातील सोनं पुरातत्त्व विभागाला सापडो अथवा न सापडो, मात्र बुंदेलखंडमधील ४००० कोटींच्या खजिन्याचा शोध भूगर्भ शास्त्रज्ञांनी लावला आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 29, 2013, 12:10 PM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, बुंदेलखंड
उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये साधूच्या स्वप्नातील सोनं पुरातत्त्व विभागाला सापडो अथवा न सापडो, मात्र बुंदेलखंडमधील ४००० कोटींच्या खजिन्याचा शोध भूगर्भ शास्त्रज्ञांनी लावला आहे. या भागात खनिज आणि खाण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर तिथं विविध खनिजांचे विपुल प्रमाणात साठे उपलब्ध असल्याचं समोर आलंय. ही खनिज संपत्ती तब्बल ४००० कोटींची असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड विभागात खनिज संपत्तीचे विपुल साठे उपलब्ध असल्याचं खाण आणि खनिज विभागाच्या अधिकार्यांेनी म्हटलंय. राज्यातील झाशी, जालौन, महोबा, हमीरपूर, बांदा, चित्रकूट आणि ललितपूर या सात जिल्ह्यांमधील विस्तीर्ण पठारांचं सर्वेक्षण करून केलेल्या अभ्यासानंतर संशोधकांनी हे सांगितलं.
यासोबतच उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील सोनभद्रमध्येही सोन्याचे साठे असल्याचं या अधिकार्यांलनी सांगितलं. तिथल्या अनेक साईट्सवर केलेल्या सर्वेक्षणानंतर एक अहवाल तयार करण्यात आला आहे. बुंदेलखंड विभागात सोनं आणि प्लाटिनमसह पोटॅश, अॅस्बेस्टॉस आणि सिलिकाचे प्रचंड साठे असल्याचं या अहवालात म्हटलंय.
आतापर्यंत उत्तर प्रदेशातून डायसापोर, डोलोमाईट, चुन्याचा दगड, मँगेनिज आणि फॉस्फोराईटसारखी खनिजंच काढली जात होती. झाशीत सर्वाधिक खनिज संपत्ती असल्याचं या अहवालात म्हटलंय. झाशीच्या विस्तीर्ण पठारात तब्बल ४.५ कोटी टन सिलिका असल्याचं सर्वेक्षणादरम्यान आढळून आलं आहे. या सिलिकाची बाजारातील किंमत तब्बल ८९० कोटी रुपये असल्याचं अधिकारी म्हणाले. स्टील, लोखंड, सिरामिक्स आणि विटरिस टाईल्समध्ये सिलिकाचा वापर केला जातो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.