गोदावरी नदीच्या पात्रात बस कोसळून २२ ठार

आंध्र प्रदेशच्या धवलेश्वरम इथं गोदावरीच्या पात्रात बस कोसळून एकाच कुटुंबातल्या २२ जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये सहा लहान मुलं आणि ८ महिलांचा समावेश आहे.

PTI | Updated: Jun 13, 2015, 01:12 PM IST
गोदावरी नदीच्या पात्रात बस कोसळून २२ ठार  title=

हैदराबाद : आंध्र प्रदेशच्या धवलेश्वरम इथं गोदावरीच्या पात्रात बस कोसळून एकाच कुटुंबातल्या २२ जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये सहा लहान मुलं आणि ८ महिलांचा समावेश आहे.

राजमुंद्री जिल्ह्यातल्या धवलेश्वरम इथं ड्रायव्हरला झोप लागल्यानं हा अपघात घडलाय. या बसची क्षमता दहा प्रवाशांची होती. असं असताना २३ जण यातून प्रवास करत होते. 

 तिरुपती मंदिर येथून दर्शन घेवून घरी परताणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला झाला. रात्री उशिरा अपघात झाला. दरम्यान, पोलिसांना अपघाताची माहिती सकाळी मिळाल्याने मदतकार्य करण्यास उशिर झाला. दरम्यान, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांनी घटना स्थळाला भेट दिली. जखमींवर उपचार करण्यात आले. तर अपघातात मृत्यू पावल्यांचे शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या अपघाताबाबत सर्व ती मदत करण्याची माहिती मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिली. तसेच या घटनाबाबत तीव्र दु: ख व्यक्त केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.