नोटबंदीनंतर या बातमीने मोदी सरकारची अडचण वाढू शकते

 पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात एक उद्देश हा खोट्या नोटा चलनातून बाद करणे हा होता. पण आता लक्षात येत आहे की जुन्या नोटांसोबत खोट्या नोटाही बँकांमध्ये जमा होत आहे. 

Updated: Dec 6, 2016, 06:16 PM IST
 नोटबंदीनंतर या बातमीने मोदी सरकारची अडचण वाढू शकते title=

नवी दिल्ली :  पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात एक उद्देश हा खोट्या नोटा चलनातून बाद करणे हा होता. पण आता लक्षात येत आहे की जुन्या नोटांसोबत खोट्या नोटाही बँकांमध्ये जमा होत आहे. 

अशा नोटा आता जरी कमी असल्या तरी ३० डिसेंबरपर्यंत यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. देशातली अनेक बँकांमध्ये खऱ्या आणि खोट्या नोटांमध्ये फरक करणारी यंत्रणा नाही. 

खोट्या नोटा संपविणे हा मोदी सरकारचा मोठा उद्देश होता. भारतीय सांख्यिकी संस्थानच्या रिपोर्टनुसार देशात सुमारे ४०० कोटी रुपयांच्या खोट्या नोटा आहेत. नोटबंदीवर सुनावणी दरम्यान ही गोष्ट सरकारने सुप्री कोर्टात ही गोष्ट सांगितली आहे. आता असे प्रश्न उपस्थित केले जात आहे की नोटबंदीने खरंच खोट्या नोटांवर अंकुश लावण्यात येईल. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार नोटबंदीच्या घोषणेनंतर २७ नोव्हेंबरपर्यंत जितके जुन्या नोटा जमा झाल्या, त्यातील १ लाख २९ हजार नोटा खोट्या आहेत. त्या एकूण जमा झालेल्या नोटांच्या ३.४ टक्के या खोट्या नोटा आहेत.