अजमेर - सियालदाह एक्स्प्रेसला अपघात २ ठार, ६३ जखमी

अजमेर - सियालदाह एक्स्प्रेसला कानपूरजवळ असलेल्या रुरा येथे पहाटे साडे पाचच्या सुमारास अपघात झाला. रेल्वेचे १४ डबे रुळावरुन घसल्याने अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार तर ६३ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Updated: Dec 28, 2016, 10:01 AM IST
अजमेर - सियालदाह एक्स्प्रेसला अपघात २ ठार, ६३ जखमी title=

कानपूर : अजमेर - सियालदाह एक्स्प्रेसला कानपूरजवळ असलेल्या रुरा येथे पहाटे साडे पाचच्या सुमारास अपघात झाला. रेल्वेचे १४ डबे रुळावरुन घसल्याने अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार तर ६३ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

याअपघातामुळे कानपूर मार्गाच्या रल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले असून यामध्ये ट्रेनच्या गार्डचाही समावेश आहे. अजमेर - सियालदाह एक्स्प्रेसचे १४ डबे पहाटे साडे पाचच्या सुमारास रुळावरुन घसरले आहेत अशी माहिती रेल्वे अधिका-याने दिली आहे. 

अपघाताची माहिती मिळताच कानपूर रेल्वे विभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरु आहे. या अपघातामुळे दिल्ली-हावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.