नऊ महिन्यांत १०७ हिंदू-मुस्लिमांचा दंगलीत बळी!

लोकांच्या धार्मिक भावनांना ठेच लागू नये, यासाठी आत्तापर्यंत गृह मंत्रालयानं जातीय दंगलींमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची धार्मिक माहिती गुप्त ठेवली होती. पण आता हीच माहिती गृह मंत्रालयानं उघड केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 25, 2013, 11:42 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जमावला जात-धर्म नसतो असं म्हणतात. पण, हाच जमाव विध्वंसक होऊन दंगली घडवून आणतो त्यावेळी त्याला बळी पडणाऱ्यालाही ‘मानवता’ हा एकच धर्म आठवतो. हेच ध्यानात घेऊन लोकांच्या धार्मिक भावनांना ठेच लागू नये, यासाठी आत्तापर्यंत गृह मंत्रालयानं जातीय दंगलींमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची धार्मिक माहिती गुप्त ठेवली होती. पण आता हीच माहिती गृह मंत्रालयानं उघड केलीय.
तर २००२ पासून म्हणजेच गेल्या दहा वर्षात देशात जवळजवळ ८४७३ दंगली घडून आल्यात. यामध्ये २,५०२ जणांनी आपले प्राण गमावले आहेत तर जवळजवळ २८,६६८ जण जखमी झाले.
यंदाच्या वर्षात म्हणजेच २०१३ मध्ये देशात झालेल्या जातीय दंगलीमध्ये एकूण १०७ जण मृत्युमुखी पडल्याची नोंद आहे. यातील ६६ जण मुस्लिम धर्माचे आहेत तर ४१ जण हिंदू धर्माचे...
गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, यावर्षी १५ सप्टेंबरपर्यंत देशात मुझफ्फरनगरसह ४९७ दंगली झाल्या, यात १०७ जण मृत्युमुखी पडले. यातील सर्वाधिक मृत उत्तर प्रदेशातील असून येथे ४२ मुस्लिम आणि २० हिंदू असे ६२ जण मारले गेले. या कालावधीत उत्तर प्रदेशात ९३ दंगली झाल्या तर १०८ तणावाचे प्रसंग उद्भतवले. या कालावधीत जातील हिंसाचारात १,६९७ जण जखमी झाले. यामध्ये ७९४ हिंदू आणि ७०३ मुस्लिम आणि २०० पोलिसांचा समावेश आहे. याच काळात उत्तर प्रदेशात २१९ मुस्लिम आणि १३४ हिंदू दंगलीत जखमी झाले.
बिहारमध्ये २०१३च्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये ४० जातीय अस्थिरता आणि २५ तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्या होत्या. यात पाच हिंदू आणि चार मुस्लिम असे नऊ जण दगावले तर १२३ हिंदू, ६६ मुस्लिम आणि १९ पोलिस जखमी झाले. गुजरातमध्ये ५४ जातील दंगली आणि २१ तणावाच्या परिस्थितीत तीन हिंदू आणि तीन मुस्लीम मारले गेले, तर ८५ हिंदू, ५७ मुस्लीम आणि पाच पोलीस जखमी झाले.

महाराष्ट्रात ५६ दंगली आणि १०० तणावाच्या परिस्थितींमध्ये तीन हिंदू आणि सात मुस्लीम मारले गेले. तर १०१ हिंदू, १०६ मुस्लीम आणि ६४ पोलिस जखमी झाले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.