या १० गोष्टी असतील यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील परेडचे आकर्षण

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाला नवी दिल्लीतील राजपथावरील पथसंचलन हे सर्वात मोठे आकर्षण असते.

Updated: Jan 23, 2016, 09:37 AM IST
या १० गोष्टी असतील यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील परेडचे आकर्षण title=

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाला नवी दिल्लीतील राजपथावरील पथसंचलन हे सर्वात मोठे आकर्षण असते. संपूर्ण देश याची वाट पाहत असतो. यंदाच्या वर्षी मात्र यात काही बदल झाले आहेत. काही नवीन आकर्षणांचा समावेश करण्यात आला आहे. 



१. यंदाची राजपथावरील परेड नेहमीपेक्षा कमी वेळाची असेल. जास्त आकर्षक असण्यासाठी यंदा परेडचा वेळ ११४ मिनिटांवरून ९७ मिनीटे इतका करण्यात आला आहे

२. यावर्षी इतिहासात पहिल्यांदाच परदेशी सैन्य राजपथावर पथसंचलन करणार आहे. यंदाच्या वर्षी फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रँकोईस होलांद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याने फ्रेंच सैनिक पथसंचलन करतील.

३. २६ वर्षांनंतर पहिल्यांदाच यंदाच्या वर्षी रिमाउंट वेटर्नरी कोअरच्या ३६ श्वानांचे एक पथक त्यांच्या ट्रेनर्ससोबत पथसंचलनात भाग घेईल.

४. वन रँक वन पेन्शन लागू झाल्यानंतर यंदा पहिल्यांदाच निवृत्त झालेल्या सैनिकांचे एक पथक गाड्यांमध्ये सवार होऊन या परेडचा हिस्सा होईल. यंदा पहिल्यांदाच तिन्ही दलांचे निवृत्त जवान या परेडचा हिस्सा होतील.

५. भारतीय नौसेना यंदाच्या वर्षीच्या परेडचे नेतृत्व करेल. लेफ्टनंट अंबिका नौटियाल या महिला अधिकारी ध्वजारोहण करतील, तर प्रिया जयकुमार २९ जानेवारीला होणाऱ्या 'बीटिंग रिट्रीट' या कार्यक्रमाच्या वेळेस ध्वज उतरवण्याचे काम करतील.

६. नौसेनेच्या कंपूत एका चित्ररथावर 'मेक इन इंडिया' दाखवण्याचाही प्रयत्न केला जाईल. नौदलाकडून देशांतर्गत होणारे युद्धनौकांचे आणि पाणबुड्यांचे उत्पादन याचे प्रदर्शन केले जाईल.

७. वायूदलाच्या चित्ररथात वायूदलाने विविध आपत्तींच्या वेळी केलेल्या बचाव कार्याचा समावेश केला जाईल.

८. डीआरडीओ त्यांनी तयार केलेला सर्व्हिलांस आणि शॉर्ट रेंज मिसाईल या परेडमध्ये उतरवतील.

९. पॅरामिलिटरी फोर्स आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या गटात यंदाच्या वर्षी उंटसुद्धा चालताना दिसतील.

१०. एकूण १७ राज्यांचे चित्ररथ यंदा परेडमध्ये भाग घेतील. महाराष्ट्राचा चित्ररथ यंदाच्या परेडमध्ये दिसणार नाही. केंद्र सरकारची काही मंत्रालयेही त्यांचे चित्ररथ यंदाच्या परेडमध्ये उतरवतील.