जालन्याजवळ अपघात ४ ठार

Nov 26, 2016, 19:10 PM IST
1/4

मयत सर्व जण औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या नागझरी गावचे रहिवासी आहे .दरम्यान रात्री एक च्या सुमारास हा अपघात झाल्याने अपघात ग्रस्तांना मदत मिळण्यास बराच विलंब झाला.

2/4

संजय बनसोडे,मयनाजी बनसोडे,श्रेयस बनसोडे,आणि भालचंद्र वाघ अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत, कार मधील मयत तिघे एकाच बनसोडे कुटुंबातील असून यात एका पाच वर्षांच्या चिमुकल्याचा देखील समावेश आहे.

3/4

भोकरदन सिल्लोड रोडवर कार आणि ट्रक ची सामोरा समोर धडक होऊन हा अपघात झाला.. या अपघातात कार मधील चौघांचा जागीच मृत्यू झाला..

4/4

जालना जिल्ह्यातील भोकरदन-सिल्लोड रोडवर मुठाळ पाटीजवळ झालेल्या अपघात 4 ठार तर 5 जण जखमी झालेत..