लाल लिची मागचं काळं सत्य

उन्हाळ्याच्या या सिझनमध्ये तुम्हाला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर लिची दिसत असेल. 

Updated: Jun 6, 2016, 04:48 PM IST
लाल लिची मागचं काळं सत्य title=

मुंबई : उन्हाळ्याच्या या सिझनमध्ये तुम्हाला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर लिची दिसत असेल. उन्हाळ्यामध्ये लिची खाणं आरोग्याला चांगलं असतं असा सल्ला डॉक्टर देतात, पण जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा लिची विकत घेण्याआधी नक्कीच विचार कराल.

लीचीच्या लाल रंगाकडे पाहून तुम्हालाही ती घ्यायची इच्छा होत असेल, पण या व्हिडिओमध्ये लिचीला स्प्रेनं लाल रंग देताना हा लिचीविक्रेता दिसत आहे. याबाबत त्याला विचारलं असता, लिचीची मागणी लक्षात घेता लाल रंगाचा स्प्रे मारत असल्याचं त्यानं निर्लजपणे कॅमेरासमोरच कबूल केलं आहे. 

पाहा लाल लिचीमागचं हे काळं सत्य