सर्दी-खोकला झालाय, हे 7 घरगुती उपाय वापरून पाहा

एकीकडे पाऊस आल्यानं उन्हापासून दिलासा मिळतो. तर दुसरीकडे पावसामध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. सध्या सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये खूप वाढ झालीय. घरोघरी सर्दी, खोकल्यानं त्रस्त रुग्ण बघायला मिळतायेत. 

Updated: Sep 2, 2015, 11:43 AM IST
सर्दी-खोकला झालाय, हे 7 घरगुती उपाय वापरून पाहा title=

मुंबई: एकीकडे पाऊस आल्यानं उन्हापासून दिलासा मिळतो. तर दुसरीकडे पावसामध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. सध्या सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये खूप वाढ झालीय. घरोघरी सर्दी, खोकल्यानं त्रस्त रुग्ण बघायला मिळतायेत. 

आणखी वाचा - हार्ट अॅटॅकची भिती, जेवणानंतर प्या कोमट पाणी

जर आपल्याला सर्दी सारखे लक्षणं दिसत असतील तर खास 7 घरगुती उपाय वापरून आपण सर्दीवर उपाय करू शकता... पाहा सात टिप्स...

1. एक चमचा कांद्याचा रस तेवढ्याच प्रमाणात मधात मिसळून दिवसातून तीन वेळा घ्या.
2. मिरपूड जाळून त्याच्या धूराचा वास घेतल्यानं बंद नाक उघडतं.
3. हळद आणि सूंठाचं चूर्ण करुन त्याचा लेप कपाळावर लावावा.
4. भेंडीचा 50 मिली काढा दिवसातून तीन वेळा घेतल्यानं घशातील खरखर आणि कोरडा खोकला झाला असेल तर आराम मिळतो. 
5. एक ग्लास गरम पाण्यात चिमुटभर मीठ, चिमुटभर खाण्याच्या सोड्यात मिसळून दिवसातून दोनवेळा आणि झोपतांना गुळण्या केल्यानं घशातील खरखरीतून आराम मिळतो.
6. 10 ग्राम लसूण 1 कप दूधात मिसळून ते 1/2 कप होईपर्यंत उकळावं. ते संध्याकाळी, झोपतांना किंवा सकाळी नाश्ता करण्यापूर्वी घ्यावं.
7. आल्याच्या तुकड्याचा काढा 20 मिली पासून 30 मिली दिवसातून तीन वेळा घेतल्यानं सर्दीत आराम मिळतो. 

आणखी वाचा - 'थायरॉइड'बद्दल या ८ महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहिती हव्या!

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.