...या कंपनीनं महिलांसाठी जाहीर केली 'मासिक पाळी'ची सुट्टी!

'प्रेग्नन्सी लिव्ह'नंतर आता 'पिरएड लिव्ह' ही  कॉन्सेप्ट आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये लोकप्रिय उद्यास आलीय 

Updated: Mar 3, 2016, 02:45 PM IST
...या कंपनीनं महिलांसाठी जाहीर केली 'मासिक पाळी'ची सुट्टी!  title=

लंडन : 'प्रेग्नन्सी लिव्ह'नंतर आता 'पिरएड लिव्ह' ही  कॉन्सेप्ट आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये लोकप्रिय उद्यास आलीय 

ब्रिटनस्थित 'कोएक्झिस्ट' या ब्रिटनस्थित कंपनीनं आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी ही सुट्टी जाहीर करून खुशखबर दिलीय. इंग्लंडच्या दक्षिण पश्चिम भागात या कंपनी आहे. देशात हे पहिल्यांदा घडतंय.

या कंपनीमध्ये बहुतेक महिला कर्मचारी काम करतात. त्यांना मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना घरूनच काम करण्यासाठी लवचिक वेळेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय... त्यामुळे त्यांना वेळोवेळी 'सिक लिव्ह'च्या नावाखाली सुट्ट्या घ्याव्या लागणार नाहीत, असं कंपनीचं म्हणणं आहे.

  

बहुतेक महिलांना 'मासिक पाळी'च्या दिवसांत पोटात दुखणं आणि इतर समस्यांना तोंड द्यावं लागतं, पण तरीही आपली गणना 'नेहमी सुट्या मारणारी कर्मचारी' किंवा 'नेहमी आजारी मारणारी कर्मचारी' म्हणून केली जाऊ नये, यासाठी त्या त्रास होत असतानाही काम करत राहतात, हे चुकीचं आहे... कंपनीनं याच प्रश्नावर हा उपाय शोधून काढलाय, असं बेक्स बॅक्स्टर या कंपनीच्या संचालकांचं म्हणणं आहे.

उल्लेखनीय म्हणजे, नाईकी या कंपनीनं २००७ मध्ये 'मेन्सट्रल लिव्ह' पहिल्यांदा जाहीर केली होती. तसंच चीन, जपान, साऊथ कोरिया आणि तैवान यांसारख्या देशांतही अशा प्रकारच्या सुट्ट्या महिला कर्मचाऱ्यांना दिल्या जातात.