नवी दिल्ली : अनेकांना जेवण झाल्यावर झोपणे, आंघोळ करणे, चहा पिण्याच्या सवयी असतात. मात्र याच सवयी तुमच्या शरीरासाठी धोकादायक असतात. या आहेत पाच गोष्टी ज्या जेवण झाल्यानंतर कधीही करु नका
झोपू नका - दुपारच्या जेवणानंतर काहींना झोपण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या शरीरासाठी चांगली नाही. पोटभरुन जेवल्यानंतर लगेचच झोपल्यास त्या जेवणाचे नीट पचन होत नाही. त्यामुळे जेवणानंतर झोपू नये.
नो स्मोकिंग - जेवणानंतर अनेकदा पुरुषांना स्मोक करण्याची सवय असते मात्र ही सवय लगेचच सोडून द्या. जेवणानंतर सिगारेट पिणे म्हणजे १० सिगारेट पिण्यासारखे आहे.
आंघोळ करु नका - जेवणानंतर कधीही लगेचच आंघोळ करु नका. यामुळे अन्नपचन व्यवस्थित होत नाही.
शक्यतो फळ खाऊ नका - प्रत्येक फळाचा पचनक्रियेचा कालावधी वेगवेगळा असतो. शक्यतो जेवणाआधी एक तास अथवा जेवणानंतर दोन तासांनी फळ खाणे चांगले.
चहा पिऊ नका - जेवणानंतर चहा प्यायल्याने अॅसिडिटीचे प्रमाण वाढते. त्यामुळे किमान जेवणानंतर एक ते दोन तास तरी चहा पिऊ नये.