ध्यानाच्या साहाय्यानं १० दिवसांत व्हा तणावमूक्त!

ट्रान्सेडेन्टल मेडिटेशन (टीएम) प्रक्रियेच्या साहाय्यानं केवळ १० दिवसांमध्ये तणाव आश्चर्यकारक रुपात कमी केला जाऊ शकतो, हे आता सिद्ध झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 16, 2014, 08:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
तीव्र मानसिक धक्का किंवा गंभीर तणावातून जाणाऱ्या व्यक्तींसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. ट्रान्सेडेन्टल मेडिटेशन (टीएम) प्रक्रियेच्या साहाय्यानं केवळ १० दिवसांमध्ये तणाव आश्चर्यकारक रुपात कमी केला जाऊ शकतो, हे आता सिद्ध झालंय.
शोधकर्त्यांनी कांगो युद्धातल्या शरणार्थिंवर `टीएम`चा प्रयोग केल्यानंतर ही आश्चर्यकारक बाब समोर आलीय. `यूएस आर्मी रिजर्व्ह मेडिकल कॉर्प्स`चे कर्नल ब्रायन रीज यांच्या म्हणण्यानुसार, याआधी करण्यात आलेल्या संशोधनात ३० दिवसांत ९० टक्के लोकांचा तणाव संपुष्टात आणण्यात यश आलं होतं. परंतु, आता `ट्रान्सेडेन्टल मेडिटेशन`च्या साहाय्यानं केवळ १० दिवसांत तणावावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं.
या संशोधनाच्या अभ्यासासाठी ११ जणांवर १० दिवसांपर्यंत ट्रान्सेडेन्टल मेडिटेशन केल्यानंतर आणखी ३० दिवस त्यांचं निरीक्षण केलं गेलं. यामध्ये `पीटीएसडी`चा स्तर ३० टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं लक्षात आलं.
शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, मेडिटेशनच्या या प्रक्रियेदरम्यान पीडित व्यक्तीला आराम मिळतो. दिवसातून दोन वेळा २० मिनिटांसाठी ट्रान्सेडेन्टल मेडिटेशन केल्यानं मेंदू योग्यरितीनं काम करतो. यामुळे संपूर्ण दिवसासाठी मानसिक तसंच शारीरिक कार्य उत्तमरित्या संचालित केले जातात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.