व्यसनांपासून, वाईट सवयींपासून दूर राहायचंय...

व्यसनांवर नियंत्रण ठेवायचं असेल तर उपचारांमध्ये तुम्ही ध्यानधारणेचा प्रयोग करू शकता. हा प्रयोग तुम्हाला निश्चितच लाभदायक ठरण्याची शक्यता असते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 5, 2014, 08:00 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
व्यसनांवर नियंत्रण ठेवायचं असेल तर उपचारांमध्ये तुम्ही ध्यानधारणेचा प्रयोग करू शकता. हा प्रयोग तुम्हाला निश्चितच लाभदायक ठरण्याची शक्यता असते. हा निष्कर्ष कम्प्युटर वैज्ञानिकांद्वारे पशू आणि मानवांवर केलेल्या सर्वेक्षणाच्या अभ्यासातून समोर आलाय.
या नवीन सर्व्हेनुसार, एक उच्चस्तरीय सांगतो की, एखादी वाईट सवय किंवा व्यसन सोडविण्यासाठी ध्यानधारणा निश्चितच उपयोगी ठरते. या गोष्टीचा वैज्ञानिक आणि गणितीय पृष्टीही दिली गेलीय. अस्तित्वात असलेल्या मानव आणि पशूंचा अभ्यास करून व्यसनांबाबत अधिक माहिती मिळवून त्यावर नवे उपाय शोधून काढणं, हा या निरीक्षणाचा उद्देश होता.
शोधकर्त्यांनी ‘एलोस्टेटिक सिद्धांता’चं वर्णन केलंय. एखाद्या व्यक्तीनं नशेच्या पदार्थांचं सेवन केलं असता किंवा रिवॉर्ड सिस्टमवर जोर दिला असता तेव्हा तो व्यक्ती आपलं संतूलन गमावतो, असं या सिद्धांतामध्ये म्हटलं गेलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.