कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी काही टीप्स

जगात कॅन्सरने सर्वाधिक मृत्यू होतात, या धोकादायक रोगापासून दूर राहण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स आहेत. कॅन्सर शरीरातील पेशींमध्ये झपाट्याने पसरणारा रोग आहे.

Updated: Jan 19, 2016, 12:49 PM IST
कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी काही टीप्स title=

मुंबई : जगात कॅन्सरने सर्वाधिक मृत्यू होतात, या धोकादायक रोगापासून दूर राहण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स आहेत. कॅन्सर शरीरातील पेशींमध्ये झपाट्याने पसरणारा रोग आहे.

खालील महत्वाच्या गोष्टी कॅन्सरचा धोका कमी करू शकतात.

  • सर्वेनुसार कॅन्सरचा धोका व्यायामाने कमी करता येऊ शकतो, यात ब्रेस्ट कॅन्सरचाही समावेश आहे. 
  • वाढणारं वजन कॅन्सरचा धोका वाढवतं, म्हणून नियमित व्यायाम करा, वजन नियंत्रणात ठेवा. वजन वाढल्यास प्रोस्टेट, प्रँकियाज, युट्रेस, ओव्हरी कॅन्सरचा धोका वाढतो. ज्येष्ठ महिलांचं वजन वाढल्याने त्यांच्यात ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो.
  • बराच वेळ खाली बसणे, खाली वाकणे आणि सतत टीव्ही पाहणे यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
  • तंबाखू आणि गुटख्याचं सेवन तुम्हाला कॅन्सरकडे घेऊन जातं. 
  • भरपूर हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा जेवणात समावेश करा, जंक फूड खाल्ल्याने कॅन्सर जवळ येण्यास सुरूवात होते.
  • उन्हाच्या तेज किरणांपासून वाचा, सूर्याच्या अल्टा-व्हायलेट किरणांपासून त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो.
  • गुटखा, दारू यामुळे तोंडाचा तसेच गळ्याचा कॅन्सर होऊ शकतो.
  • त्वचेत कोणत्याही प्रकारचा बदल झाल्यास, त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा, हे देखील कॅन्सरचे लक्षण असू शकते.