6 गोष्टी तुम्हाला कॅन्सरपासून ठेवतील दूर

कॅन्सर हा जगातील एक भंयकर आजारांपैकी एक आहे. यावर अजून कोणताही ठोस उपाय मिळालेला नाही. पण कॅन्सर होऊ नये यासाठी आपण काळजी आधीच घेऊ शकतो. त्यासाठी 7 गोष्टी खाणं फायदेशीर ठरतं.

Updated: Feb 6, 2017, 12:55 PM IST
6 गोष्टी तुम्हाला कॅन्सरपासून ठेवतील दूर title=

मुंबई : कॅन्सर हा जगातील एक भंयकर आजारांपैकी एक आहे. यावर अजून कोणताही ठोस उपाय मिळालेला नाही. पण कॅन्सर होऊ नये यासाठी आपण काळजी आधीच घेऊ शकतो. त्यासाठी 7 गोष्टी खाणं फायदेशीर ठरतं.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडंट असतात. फायबर, फ्लॅओनोईड्सचं प्रमाण देखील यामध्ये अधिक असतं. हे पेशीचा नाश होऊ नये म्हणून मदत करतं. अँटीऑक्सीडंट हे कर्करोगाच्या पेशींची वाढ होऊ नये म्हणून मदत करतं.

द्राक्ष 

अँटीऑक्सीडंटचा द्राक्ष हे खूप मोठे स्रोत आहे. द्राक्ष हे कॅन्सरवर खूपच प्रभावी आहे. कॅन्सरवर मात करण्यासाठी ते मदत करतं. 

लसूण

रोज लसून खाल्याने अनेक आजार दूर राहतात. लसणाचा वास हा अनेक आजारांना शरीरापासून दूर ठेवतो.

हिरव्या पालेभाज्या

रोजच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. अँटीऑक्सीडंट बीटा कॅरोटीन आणि ल्यूटीन हे कर्करोगच्या पेशींची वाढ कमी करण्यास मदत करतात. कोशिंबिरचा देखील रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे.

बेरीस

ब्लू बेरीस, ब्लॅक बेरीस आणि स्ट्रॉबेरीस या अँटीऑक्सीडंट एक मोठा स्रोत आहे. यामधून कर्करोगाला लांब ठेवणारं अँटीऑक्सीडंट मोठ्या प्रमाणात मिळते.

किवी 

किवीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी, अँटीऑक्सीडंट, व्हिटामिन ई, मोठ्या प्रमाणात असतं. जे कॅन्सरला तुमच्यापासून लांब ठेवतं.