मुंबई : हल्ली त्वचेच्या समस्येवर अनेक केमिकल उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. मात्र या उत्पादनांमुळे साईडइफेक्ट होण्याची भिती असते. त्यामुळे अशा समस्यांवर घरगुती उपचार करणे चांगले. तांदळाचे पीठ हा असा उपाय आहे ज्याच्या वापराने तुम्ही त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर करु शकता.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे - डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर कऱण्यासाठी दोन चमचे तांदळाच्या पिठात अर्ध पिकलेलं केळ आणि एक चमचा साय घालून नीट पेस्ट बनवाय. या मिश्रणाला डोळ्यांच्या खाली लावा. यामुळे नक्की फायदा होईल.
मुरुमांवर गुणकारी - तांदळाच्या पिठात एक चमचा मध आणि कोरफडीचा गर मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मुरुमांवर लावा. काही दिवसांतच फरक जाणवेल.
टॅनिंग दूर होईल - चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी एक चमचा तांदळाच्या पिठात लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. टॅनिंग झालेल्या भागावर ही पेस्ट लावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.