न्यू यार्क : नियमितपणे सेक्स केल्याने प्रजननसाठी अक्षम म्हणविणाऱ्या महिला गरोदर राहण्याची शक्यता वाढते. नव्या रिसर्चनुसार नियमित यौन क्रियेमुळे महिलांमध्ये शारिरीक परिवर्तन होते त्यामुळे हे शक्य होते आणि घरात पाळणा हलण्यास मदत होते.
अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठातील किंसले इन्स्टिट्यूटच्या प्रमुख लेखिका टायर्नी लॉरेंज यांनी म्हटले की, सामान्यपणे म्हटले जाते. घरात पाळणा हलण्यासाठी दाम्पत्य प्रयत्न करीत असतील तर त्यांनी नियमित सेक्स केला पाहिजे, यामुळे महिलांमध्ये प्रेग्नेंसीची शक्यता वाढते. ज्या महिला वंधत्वाने पीडित असतील त्यांनी हा उपाय करून पाहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. पण अजून स्पष्ट झाले नाही की ते कशा पद्धतीने काम करते.
दोन पानांची प्रकाशित या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, रिसर्चमध्ये समोर आले की सेक्शुअल अॅक्टीव्हीट शरीरात गर्भधारणासंदर्भातील इम्युनिटी वाढविण्यास मदत करते. यासाठी ३० महिलांवर परिक्षण करण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.