पोषक आहार आणि पचन

'आहार शास्त्र' ही योग्य आहार घेण्याची कला आहे. विविध गटातील, वेगवेगळ्या परीस्थितील लोकांची आरोग्याची परिस्थिती आणि त्यांच्या आहाराच्या आणि पोषकतेच्या तत्वांचा यामध्ये अभ्यास केला जातो. पोषण हे समतोल आहाराचे शास्त्र आहे. त्यामुळे शरीरप्रकृती चांगली रहाते, रोगांपासूनही संरक्षण होते.

Updated: Aug 30, 2015, 09:36 PM IST
पोषक आहार आणि पचन title=

मुंबई : 'आहार शास्त्र' ही योग्य आहार घेण्याची कला आहे. विविध गटातील, वेगवेगळ्या परीस्थितील लोकांची आरोग्याची परिस्थिती आणि त्यांच्या आहाराच्या आणि पोषकतेच्या तत्वांचा यामध्ये अभ्यास केला जातो. पोषण हे समतोल आहाराचे शास्त्र आहे. त्यामुळे शरीरप्रकृती चांगली रहाते, रोगांपासूनही संरक्षण होते.

 पोषकता आणि त्याचा शरीरवर होणारा परिणाम याचाच अभ्यास या आहार शास्त्रात होतो.

यात अन्न पोटात घेणे, पोषक द्रव्य पचविणे शोषून घेणे, पाठविणे आणि वापर करणे आणि शेवटी त्याचा निचरा करणे यांचा समावेश होतो. या प्रक्रियेला 'पचन' असे म्हणतात.

थोडक्यात व्यवस्थित पोषणामुळे शरीराच्या विविध भागांना योग्य असा अन्नाचा पुरवठा होतो, याशिवाय अन्नाचा पूरवठा, हा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि मानसिक या गोष्टींवरही अवलंबून असतो.

अन्नाबाबतीतील प्रत्येक गोष्ट, खाण्यापासून ते त्याचा निचरा होइपर्यंतची प्रत्येक गोष्ट न्युट्रिशनमध्ये अंर्तभूत आहे. अन्नाचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक असे विविध पैलू आहेत. त्यांचा आहार आणि पथ्ये यामध्ये अभ्यास केला जातो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.